सोपा चना मसाला

साहित्य

  • २५० ग्रॅम काबुली चणे
  • इंच आले
  • ४ हिरव्या मिरच्य
  • २ चमचे गरम मसाला पूड
  • १ चमचा लाल तिखट
  • २ चमचे धने-जिरेपूड
  • अर्धी वाटी तेल
  • चवीनुसार मीठ

कृती

  • आदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे.
  • आले किसावे,मिरच्या उभ्या चिराव्या. प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी उकळले की चणे घालावेत.
  • प्रेशर टाईम १५ मिनिटे शिजवावेत. कुकर गार झाल्यावर उघडावा. चणे चाळणीवर ओतून निथळावे.
  • एका पातेलीत घालून सर्व मसाला व मीठ चण्यात घालून मिसळावे. आल्याचा कीस व मिरच्या वरच्या थरावर पसराव्या. छोट्या पातेलीत तेल कडकडीत तापवावे चण्यांवर ओतावे.
  • पाच मिनिटे मंद आंचेवर उकळू द्यावे. परदेशात शिजलेल्या चण्याचे डबे मिळतात. त्यात मीठ असल्यास मीठाचे प्रमाण थोडे कमी करावे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*