सोपा चना मसाला
साहित्य
- २५० ग्रॅम काबुली चणे
- इंच आले
- ४ हिरव्या मिरच्य
- २ चमचे गरम मसाला पूड
- १ चमचा लाल तिखट
- २ चमचे धने-जिरेपूड
- अर्धी वाटी तेल
- चवीनुसार मीठ
कृती
- आदल्या रात्री चणे भिजत घालावेत. सकाळी पाणी ओतून निथळावे.
- आले किसावे,मिरच्या उभ्या चिराव्या. प्रेशर कुकरमध्ये ३ कप पाणी उकळले की चणे घालावेत.
- प्रेशर टाईम १५ मिनिटे शिजवावेत. कुकर गार झाल्यावर उघडावा. चणे चाळणीवर ओतून निथळावे.
- एका पातेलीत घालून सर्व मसाला व मीठ चण्यात घालून मिसळावे. आल्याचा कीस व मिरच्या वरच्या थरावर पसराव्या. छोट्या पातेलीत तेल कडकडीत तापवावे चण्यांवर ओतावे.
- पाच मिनिटे मंद आंचेवर उकळू द्यावे. परदेशात शिजलेल्या चण्याचे डबे मिळतात. त्यात मीठ असल्यास मीठाचे प्रमाण थोडे कमी करावे