पावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय
पावसाळ्यात अनेक आजार उद्भवतात ज्यामुळे याकडे वेळेत लक्ष न दिल्यास हे महागात पडू शकते. यामध्ये विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात पंचकर्मासारखे उपचार करून किंवा संतूलित आहाराचे सेवन करून काळजी घेऊ शकता. हलके आणि ताजे अन्न खावे, उकळलेलं पाणी किंवा हर्बल टी प्यावे, तेलकट खाऊ नये. शिळे अन्न खाऊ नका.
मधाचा वापर करा, तेला ऐवजी तुपाचा वापर करा, जेवणानंतर ताक प्या, एक वर्ष जुना तांदुळ जेवणात वापरा. या उपायांनी तुम्ही या आजारांचा प्रतिबंध करू शकतात.
पंचकर्मामुळे शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. या प्रक्रियेमुळे तुम्ही पावसाळ्यात आजारांपासून दूर राहु शकता. शरीरातील तीन दोष संतुलित करणे आवश्यक वात, कफ, पित्त हे दोष संतुलित करणं आर्युवेदात अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय. कफ दोषामुळे २८ रोग, वात दोषामुळे ८० रोग, पित्त दोषामुळे ४० रोग होत असल्याचं आर्युवेदात नमुद करण्यात आलं आहे.
मॉडरेट एक्सरसाईज हा देखील एक पावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी मदत करू शकते. पावसाळ्यात जास्त हेवी एक्सरसाईज करू नका. या मौसमात मॉडरेट एक्सरसाईज करणंच योग्य आहे. यासाठी तुम्ही योगाही करू शकता.