नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरावे कि नाही?
कोरोनामुळे आपण कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीने विविध पावले उचलत आहोत. त्यापैकी एक म्हणजे सॅनिटायझर.
परंतु हे सॅनिटायझर लहान मुलांसाठी (साधारण 1 ते 10 वर्ष ) किती सुरक्षित आहे? हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. आज आम्ही आज तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत…
तज्ज्ञांनी असं कधीही सांगितलं नाही की, लहान मुलांचे हात धुण्यासाठी सॅनिटायझर वापरू नका.
मात्र पाणी आणि साबण वापरून हात धुणे हा पहिला पर्याय तुमच्यासाठी खुला आहे.
जर साबण आणि पाणी नसेल तर सॅनिटायझर वापरू शकता. मात्र ते सॅनिटायझर वापरत असतील तर तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा.
हॅन्ड सॅनिटायझरमध्ये 60% अल्कोहोल असते. जे कोणत्याही अल्कोहोल पेयामधील प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे.
सॅनिटायझर वापरल्यावर डोळ्यांना हात लावणे किंवा हात नकळत तोंडात जाणे यांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी खालील सावधगिरी बाळगली पाहिजे –
- फक्त 1 थेंब हॅन्ड सॅनिटायझर घ्या. ते जोपर्यंत पूर्णपणे सुकून जात नाही तोपर्यंत हाथ धुवा.
- सॅनिटायझर लहान मुलांचा हात सहज जाईल अशा ठिकाणी ठेऊ नका.
- तुमच्या मुलांना हॅन्ड सॅनिटायझर वापरल्यावर हात तोंडाला किंवा इतर धुळीच्या ठिकाणी ठेऊ नका असे सांगा.
वरील सर्व उपाय असेल तरी नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरणे योग्य आहे का? असा प्रश्न कायम आहे. याबाबत बोलायचे झाले तर नवजात बालकांसाठी सॅनिटायझर वापरू नका. कारण लहान बाळ स्वतःहून कुठेही फिरण्यासाठी जाऊस शकत नाही. त्यामुळे पालकांनी खालील काळजी घेतली पाहिजे.
- बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुऊन लहान मुलांना घ्या.
- त्यांची खेळणी किंवा लादी, त्यांची अंथरूण हे स्वच्छ ठेवा. ज्या खेळणी धुता येत असतील त्या कोमट पाण्याने धुऊन घ्या.
- हॅन्ड सॅनिटायझर वापरून लगेच त्यांचा संपर्कात आलात तर ते लहान बाळ आपला हात चाटणार नाही यांकडे लक्ष ठेवा.