आरोग्याची त्रिसूत्री झोप
झोपेच्या वेळा तरुण पिढीतच नाही तर कोणत्याच वयोगटात ठरलेल्या नाहीत. कामाचे तास, तणाव, लहान मुलांमध्ये अभ्यास तर, काही लोकांमध्ये फक्त मोबाईल, टीव्ही पाहणे या कारणावरून देखील जागरणं होतात.
अनियमित झोपेचे दुष्परिणाम…
- चौरस आणि समतोल आहार, नियमित आणि चतुरस्त्र व्यायाम यांच्याबरोबर योग्यवेळी योग्य कालावधीची झोप ही आरोग्याची त्रिसूत्री असते.
- योग्य झोप मिळाली नाही, तर काही शारीरिक आणि मानसिक आजार होणार हे नक्की. शारीरिक आजारांमध्ये, अर्धांगवायू, दम्याचे अॅटॅक येणं, फेफरे म्हणजे झटके येणं, प्रतिकारशक्ती कमी होणं, चेहऱ्यावर-अंगावर सूज येणं, वजन वाढणं आणि त्यातून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार उद्भवणं असे त्रास संभवतात.
- मानसिक आजारांमध्ये चिंता, नैराश्य, भ्रमिष्टपणा हे त्रास उद्भवतात, शिवाय वाहन चालवताना अपघात होणं, स्मृती कमी होणं, एखाद्या गोष्टीमध्ये सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता घटणं हे परिणाम आढळतात
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.