जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बद्दल सर्व काही
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. त्यांची निवड युपीएससी मार्फत होते व नेमणूक राज्यशासन करते.
मुख्य कार्यकारी अधिकारीची कामे आणि अधिकार
- जिल्हा परिषदेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, कायदेविषयक तरतुदीचे जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करणे तसेच जिल्हा परिषदेने घेतलेल्या विविध निर्णयाची अंमलबजावणी करणे.
- जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाच्या अधिकार्यांची दोन महीने मुदतीपर्यंतची रजा मंजूर करणे.
- जिल्हा परिषदेमधील वर्ग 3 व वर्ग 4 दर्जाच्या कर्मचार्याची नेमणूक करणे.
- जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्यांवर नियंत्रण ठेवणे.
मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या कार्यावर जिल्हा परिषदेची प्रगति अवलंबून असते असे म्हणतात. हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो. यांचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो.