२३ जानेवारी : पराक्रम दिवस सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिवस

आज २३ जानेवारी : पराक्रम दिवस

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ , बंगाल प्रांतात झाला.

सुभाषबाबू १९३८ हरीपुर व १९३९ त्रिपुरी काँग्रेसचे अध्यक्ष होते.

नेताजींनी १९३९ मध्ये ” फॉरवर्ड ब्लॉक ” या पक्षाची स्थापना केली.

डिसेंबर १९४० मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

जानेवारी १९४१ मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली।

नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सिंगापूर येथे ‘ स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार ‘ स्थापन केले.

सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती , त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते ..

Leave a comment