दिमित्री इव्हानोव्हिच मेंडेलीव्ह

  • Father Of The Periodic Table…
  • Mendeleev’s Periodic Table…

रशियन रसायनशास्त्रज्ञ व संशोधक.

मूलद्रव्यांचे वर्गीकरण करण्याचे मुख्य श्रेय मेंडलिव्ह यांना जाते.रसायनशास्त्राला मान्य असलेल्या आवर्त सारणीच्या प्राथमिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना “आवर्त सारणीचे जनक” असे म्हणतात.

1869 साली मेंडेलिव्ह या रशियन शास्त्रज्ञाने त्याकाळी माहिती असलेली सर्वच्या सर्व 63 मूलद्रव्यं एका आवर्तसारणीमध्ये मांडून मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाला एक वेगळी दिशा दिली आणि जगातील पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी (चढत्या अणुवस्तुमानानुसार) तयार केली…

मेंडेलिव्हने ‘प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री’ हे पुस्तक लिहिलं.हे पुस्तक पुढे पाठ्यपुस्तक म्हणूनही वापरल गेलं.

मेंडेलिव्हला 3 वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचितच राहावे लागले.

101 व्या अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*