अशी मिळवा अतिरिक्त चरबीपासून सुटका
हल्ली वजन वाढण्याची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता…
- जास्तीत जास्त पायी चालत जाण्याचा प्रयत्न करा. लिफ्टच्या ऐवजी शिड्यांचा वापर करा, ऑफिसमध्ये चहाच्या ऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफीचं सेवन करा.
- जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळी नेहमी सरळ बसण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची मान, पाठ, खांद्यांमध्ये दुखणं थांबेल. जर तुमची खुर्ची आरामदायक नसेल तर कुशन ठेवून बसा.
- स्वतःच्या डेस्कवर पाण्याची बॉटल ठेवा आणि ठराविक वेळानंतर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि सतत लघवी लागल्यानंतर तुम्ही वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने जागेवरून उठाल.
- स्ट्रेचिंग, नेक रोटेशन, सीटेड टोरसो टिव्स्ट, क्रॉस्ड लेग टो रीच, शोल्डर रोटेशन हे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
- स्नॅक्सच्या वेळेत जंक फूड न खाता हेल्थी फुड खाण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये भुक लागल्यानंतर ड्राय फ्रुटस खाण्याचा प्रयत्न करा.
- वजन कमी करण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचं असतं ते म्हणजे ऑफिसला जाण्याआधी सकाळचा नाष्ता पोटभर करा. सकाळच्या नाष्त्यात दोन ते तीन फळं खा. त्यात केळी, सफरचंद आणि डाळिंबाचा समावेश करा.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.
🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप : https://letsupapp.page.link/apps