मेरी ख्रिसमस: चिमुकल्यांना भेटवस्तू देणारे ‘सांताक्लॉज’ नेमके कोण?

आज कोरोनाच्या काळात देशभर ख्रिसमसचा उत्साह आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा नाताळाचा सण उत्साहात पण अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे.

दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेले सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतात. त्यांच्या हातात एक भली मोठी बॅग असते, ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच भेटवस्तू ठेवलेल्या असतात, ज्या ते सगळ्या लहान मुलांमध्ये वाटतात.

जाणून घेऊ खऱ्या सांताबद्दल..

  • सेंट निकोलस यांचा जन्म तिसऱ्या शतकात उत्तर ध्रुवावर स्थित मायरा येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात.
  • ते लहान असताना अनाथ होते. त्यानंतर, येशूवर त्याचा विश्वास वाढत गेला आणि त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला.
  • पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला. निकोलस यांना लोकांना मदत करणे आवडत होते.
  • विशेषतः लहान मुले, ज्यांना परिस्थितीमुळे स्वताच्या इच्छा पूर्ण करता येत नव्हत्या. निकोलस या मुलांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करायचे.
  • परंतु, त्यांना त्यांची ओळख कोणालाही सांगायची इच्छा नव्हती, म्हणून ते कपडे बदलून मध्यरात्री घरातून बाहेर पडायचे. आपल्या भल्यामोठ्या झोळीतून ते सर्व मुलांना आणि गरजूंना भेट वस्तू वाटून द्यायचे.

आणि समोर आला सांताचा नवा लूक

आधुनिक काळातील सांता 1930 साली अस्तित्वात आले. हेडन सँडब्लोम नावाच्या एक कलाकाराने कोका-कोलाच्या जाहिरातीमध्ये सांताक्लॉजची भूमिका साकारली होती. जवळपास 35 वर्ष तो सांता म्हणून टीव्हीवर झळकला. लाल कपड्यांमध्ये पांढरी दाढी असलेल्या सांताचे हे नवीन रूप मुलांना खूप आवडले.

Leave a comment