कम्युनिस्ट नेता लेनिन
जन्म: 22 एप्रिल 1870, Ulyanovsk, Russia
मूळ नाव- व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह
रशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत.
सोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते.
१९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली,त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते.इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते.
रशियन राज्यक्रांतीनंतर १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली.
मार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले.क्रांती घडवून आणली,झारला संपविले.नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली.नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली.
कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे.
लेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते.
त्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे.