हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा दूर करण्यासाठी
सध्या एका जागी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अनेकांना मानसिक थकवा जाणवतो. हा थकवा दूर करायचा सोपा उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. पण, काही जणांना थंडीच्या दिवसांत जीममध्ये जाण्याचं सोडाच घरीही व्यायाम करण्याचा कंटाळा आलेला दिसतो. हा कंटाळा कसा टाळता येईल? हे पाहुयात…
- व्यायाम करताना तुमच्या रुटीनमध्ये थोडा बदल ठेवा. चालायला जात असाल तर कधी जॉगिंग करून बघा. जाण्याचा रस्ता बदला. जिममध्येही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामप्रकार ट्राय करा. एखाद्या दिवशी तुम्ही फक्त डान्स करा. याने तुमचा उत्साह टिकून राहील.
- व्यायामाचे नेमके उद्दिष्ट असायला हवे. असे असेल तर व्यायामाचा कंटाळा येणारच नाही. त्यामुळे तुम्ही व्यायाम का करताय, हे ठरवा. वजन कमी करायचं असेल तर ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा. याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
- व्यायामासाठी एखादा जोडीदार सोबत शोधा. याने व्यायामालाही मजा येईल आणि एकमेकांच्या सोबतीने व्यायामही सुरू राहील. याने कंटाळा दूर होईल.