आता PVC (प्लास्टिक) आधारकार्ड फक्त 50 रुपयांत घरपोच मिळणार

सरकारने पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC) कार्डवरील आधार कार्डच्या छपाईस कायदेशीर मान्यता दिली आहे. पीव्हीसी आधार कार्ड हे एटीएम कार्ड किंवा डेबिट अथवा क्रेडिट कार्डासारखेच असते.

PVC (प्लास्टिक) आधारकार्ड

फक्त 50 रुपयांत मिळणार आधारकार्ड

पीव्हीसी कार्डवर आधार छापण्यासाठी आणि ते घरी मागवून घेण्यासाठी प्रत्येकी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

आधार कार्ड’ असे मागवा

  • त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. नंतर येणारा तुमच्या स्क्रीनवरील सिक्युरिटी कोडही प्रविष्ट करावा लागेल.
  • कुटुंबातील इतर सदस्यांचेही आधार मागवू शकाल- पुढे मोबाइल क्रमांक नोंदणी आहे किंवा नाही असे 2 पर्याय दिसतील. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता.
  • ज्या व्यक्तीचे PVC आधार कार्ड घ्यायचे त्यांचा आधार क्रमांक आणि तुमचा मोबाइल क्रमांक टाकून ओटीपी मागवू शकता.

आधार ट्रॅकही करता येणार

आधार क्रमांक, सिक्युरिटी कोड आणि ओटीपी टाकल्यानंतर तुमचे आधार कार्ड तपशील दिसतील. ते तपासून पाहिल्यानंतर पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्ही त्याची पावती डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड केलेल्या पावतीवरील 28 अंकी सर्व्हिस रिक्वेस्ट नंबरवरून तुम्ही आधार ट्रॅक करू शकाल.

Leave a comment