संसद बहुमताचे प्रकार आणि वापर

साधे बहुमत (Simple Mejority)

उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते.

कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत ओळखले जाते.

उदा.

साधे बहुमत समजण्यासाठी आपण लोकसभेतील संख्येचा वापर करून समजून घेऊया.

  • लोकसभेतील सदस्य संख्या : 545
  • अनुपस्थित सदस्य : 45
  • मतदान न करणारे : 100
  • म्हणजे उपस्थित व मतदान करणारे : 400
  • 400 च्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 200 + 1
  • तर लोकसभेतील साधे बहुमत असेल : 201

वापर/उपयोग

  1. सर्वसाधारण धन/ वित्त विधेयक पारित करण्यासाठी
  2. अविश्वास प्रस्ताव/ विश्वास प्रस्ताव/ निंदाव्यंजक प्रस्ताव/ स्थगन प्रस्ताव पारित करण्यासाठी
  3. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेत साध्या बहुमताचा वापर होतो.
  4. आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठ
  5. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी.
  6. कलम 2 व 3 नुसार नवीन राज्य निर्मिती
  7. संसदेत विधापरिषद निर्मिती/नष्ट करण्यासाठी

सर्वकष बहुमत /पूर्ण बहुमत (Absolute Majority)

सदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% पेक्षा जास्त सर्वंकष बहुमत संदर्भित करते.

उदा.

  • लोकसभा सदस्य संख्या : 545
  • तर लोकसभेतील सर्वंकष बहुमत असेल : 545 च्या 50% + 1
  • म्हणजेच 273

वापर/उपयोग

  1. सर्वंकष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होताना दिसत नाही.
  2. परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे स्थापनेवेळी या बहुमताचा वापर होतो. (सर्वसाधारण निवडणुकांनंतर)

प्रभावी बहुमत (Effective mejority)

सदनाच्या सदस्य संख्येच्या (रिक्त जागा वगळता) 50% पेक्षा जास्त (50%+1) संख्या प्रभावी बहुमत संदर्भित करते.
50% of the effective strength of the house
When Indian Constitution Mentions “All the then member” that refers to the effective Majority

उदा.

  • लोकसभा सदस्य संख्या : 545
  • रिक्त जागा : 45
  • म्हणजे त्यावेळी सदनाची संख्या 3 500 =
  • म्हणून प्रभावी बहुमत असेल 500 च्या 50% + 1 : 250 + 1 = 251 =

वापर/उपयोग

  1. उपराष्ट्रतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत वापर (कलम 67b)
  2. लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे.
  3. राज्य विधानसभेचे व विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे.

विशेष बहुमत (Special Majority)

साधे बहुमत, सर्वंकष बहुमत, प्रभावी बहुमत या व्यतिरिक्त असलेले बहुमत हे विशेष बहुमत प्रकारात येईल.

विशेष बहुमताचे 4 प्रकार आहेत.

प्रकार 1

कलम 249 नुसार असलेले विशेष बहुमत.
सदनातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत. म्हणजेच,

उदा.

  • राज्यसभा सदस्यसंख्या : 245
  • परंतु फक्त 150 सदस्य हे उपस्थितांपैकी मतदान करणार असतील.
  • तर विशेष बहुमत 101 लागेल.

वापर/ उपयोग

राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यासाठी आधी ते .विधेयक या प्रकारातून राज्यसभेत पारित होते.

प्रकार 2

कलम 368 नुसार विशेष बहुमत
सदनातील एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने (50% पेक्षा अधिक मते) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ते संमत झाले पाहिजे.

उदा.

  • लोकसभा सदस्य संख्या : 545
  • यांचे एकूण बहुमत म्हणजे (50% + 1) = 273 =
  • आणि
  • उपस्थित व मतदान करणारे : समजा 500
  • त्यांचे 2/3 बहुमत म्हणजे = 334 .

वापर/उपयोग

1. घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी

2. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे.

3) महालेखापरीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना यांना पदावरून दूर करतेवेळी

4. राष्ट्रीय आणीबाणीस मान्यतेसाठी दोन्ही गृहात या.प्रकाराचे बहुमत असावे लागते.

प्रकार 3

कलम 368 नुसार विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता.

म्हणजे प्रकार 2 नुसार विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांच्या साध्या बहुमताने विधेयक पारित होते.

उदा.

प्रकार 2 नुसार विशेष बहुमत आणि 50% + 1 राज्यांची मान्यता म्हणजे, 28 राज्यांच्या निम्यापेक्षा जास्त 15 राज्यांची मान्यता

वापर व उपयोग

  1. या प्रकारातील बहुमत हे देशाच्या संघराज्यीय संरचनेतील जर बदल होणार असेल तर वापरले जाते.
  2. जेथे संघराज्यीय संरचनेत बदल होणार असेल, अशा घटनादुरुस्ती विधेयकांमध्ये या प्रकाराचा वापर होतो.
  3. जसे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थान
  4. National Judicial Appointment Commission (NJAC) हे या प्रकारातील दुरुस्तीचे उदाहरण आहे.

प्रकार 4

कलम 61 नुसार विशेष बहुमत म्हणजे सदस्याच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने

लोकसभा : 545 च्या 2/3 = 364 मते

राज्यसभा : 245 च्या 2/3 = 164 मते

वापर/उपयोग

राष्ट्रपतींवरील महाभियोगावेळी हे बहुमत लागते.

You might also like
Leave a comment