जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे? मग खास तुमच्यासाठी

अनेकांसाठी चहा म्हणजे स्वर्गातील अमृतच. विशेष म्हणजे या लोकांना केव्हाही, कोणत्याही वेळेला, कुठेही चहा हवा असतोच. काहीजणांना तर जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्याला घातक आहे. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊयात…

  • चहापावडरमध्ये आम्ल पदार्थ असतात. हे पदार्थ अन्नातील प्रोटीनमध्ये मिसळतात. यामुळे प्रोटीन टणक बनतात, परिणामी ते पचायला जड जाते. यामुळे जेवल्यानंतर तातडीने चहा पिणे टाळावे.
  • चहामध्ये कॅफिनही असते. ज्यामुळे रक्‍तदाब वाढतो. त्याचसोबत कॅफिनचे अतिप्रमाण शरीरात कोर्टिसोल वाढवते. यामुळे शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.
  • चहामध्ये पॉलिफेनॉल्स आणि टेनिन इत्यादी घटक असतात जे जेवणातील लोह शोषत नाहीत. परिणामी शरीराला त्याचा फायदा होत नाही. विशेषत:
  • महिलांमध्ये लोहाची कमतरता असते, त्यांच्यासाठी जेवल्यानंतर चहा पिणं नुकसानकारक ठरते.
  • जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय राहू शकत नसाल, तर जेवणानंतर किमान एक तासाने घ्या.
You might also like
Leave a comment