कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बऱ्याच चिमुकल्यांचे पोषणकर्ते दुरावले आहेत. कुणाच्या वडिलांना तर कुणाच्या आईला कोरोनाने हिरावले आहे.
काही मुलांचे तर दोन्हीही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. या अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने एक योजना आणली असून योजनेच्या माध्यमातून मुलांना मदत मिळणार आहे.
काय आहे ही योजना?
पंतप्रधान मोदींनी जी मुले कोरोनाकाळात अनाथ झाली आहेत, त्यांच्यासाठी ‘PM-CARES for Children’ ही योजना आणली आहे.
या मुलांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळणार आहे. ही मदत वयाच्या १८ वर्षांपर्यंत मिळणार आहे. तर वयाच्या २३ वर्षाच्या नंतर १० लाखांची मदत या फंडातून मिळणार आहे.
तसेच या अनाथ मुलांचा ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत आरोग्य विमाही काढला जाणार आहे. ज्याचे हप्ते PM CARES मधून दिले जाणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयातून सांगण्यात आले आहे.