बेसन लाडू | Besan Ladu Recipe in Marathi
बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 250 ग्रॅम हरभरा पीठ / लहान वाटाण्याचे पीठ / बेसन ( भरड पद्धतीचे )
- 100 ग्रॅम शुद्ध तूप
- 125-150 ग्रॅम पीठी साखर
- 50 ग्रॅम मनुका / चिरोंजी / बदाम ( ऐच्छिक )
- 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर
- 1.5 टेबल स्पून दूध
कृती
- बेसन आणि तूप एकजीव होईपर्यंत आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे , सतत हलवत रहावे.
- या प्रक्रियेला खूप वेळ लागतो, त्यामुळे कधी मध्यम तर कधी मंद आंच करावी, परंतु कधीही पूर्ण आंच करू नये, कारण त्यामुळे पीठ जळण्याची शक्यता जास्त असते.
- कायम कडेपासून पूर्ण वेळ हलवत रहाणे चालू ठेवणे.
- एकदा छान वास येऊ लागला , सुंदर सोनेरी रंग आला की त्यावर दूध शिंपडावे आणि पूर्णपणे एकजीव होण्यासाठी मिसळत रहावे आणि आंच लगेच बंद करावी , मिश्रण थंड होण्यासाठी एका मोठय़ा प्लेटवर ठेवावे.
- मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, वेलदोडा पावडर टाकून एकत्र करावे.
- तुम्ही साखर, भाजलेले बेसन व तूप यांचे मिश्रण एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या छोट्या जारमध्ये एकावेळी थोडे थोडे मिश्रण करू शकता.
- एकदा मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये सुकामेवा घालून त्याचे गोल गोल गोळे बनविणे .
- मिश्रण जर तुम्हाला जास्त मऊ वाटले तर आकार दिल्यानंतर आकार बिघडू नये म्हणून ते 20-30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवू शकता .
- बदाम, मनुका किंवा चिरोंजीने सजवणे आणि खायला देणे.