टाच दुखीवर घरगुती उपाय
सांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी जशी सामान्यतः अनेकांमध्ये आढळून येते तशी टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का? आज आपण टाचदुखीचे उपाय जाणून घेणार आहोत. तसं तर टाचदुखी हि काही पथ्य पाळून बरी होऊ शकते:
- टाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे.
- ताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत.
- हिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे ▪ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात.
- चिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. विश्रांती घेणे यावरील उत्तम उपाय आहे. तेलाचा अभ्यंग, शेक याने बरे वाटत असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे योग्य असते.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.