वॉइस ओवर मध्ये करिअर संधी, वॉइस ओवर म्हणजे काय?

सध्याच्या डिजीटल युगात व्हॉईस ओव्हर कलाकारांचे महत्त्व आणि वर्चस्व वाढत आहे. यात काही नवल नाही की सध्या व्हॉईस- ओव्हर कलाकार म्हणून करिअर करणे तरुणांसाठी एक उत्तम पर्याय मानले जाते. चला तर आज व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणून करिअरशी संबंधित विविध पैलू जाणून घेऊयात…

व्हॉईस ओव्हर म्हणजे काय?

याला ऑफ कॅमेरा किंवा ऑफ स्टेज कॉमेंट्री म्हणून देखील ओळखले जाते. थोडक्यात काय तर व्हॉईस ओव्हर कलाकाराची जबाबदारी मुख्यतः लेखी शब्दांना ऑडिओ किंवा व्हॉईस मध्ये बदलायची आहे. यासाठी बोलण्याची आणि संवादाची कला प्रमुख आहे.

व्हॉईस ओव्हर कलाकार आणि निकष :

  • सामान्यतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी एक चांगला आवाज एकमात्र निकष आहे.
  • प्रामुख्याने एक चांगला आवाज आणि विविध प्रकाराच्या व्हॉईस मॉड्युलेशन वर नियंत्रण असणे ही व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट बनण्याची प्राथमिक आवश्यकता आहे.
  • आपल्याकडे भाषा आणि व्याकरणाचे चांगले ज्ञान असायला हवे आणि उच्चारणवर नियंत्रण असावे.
  • यासाठी आपण काही अभिनयाच्या अभ्यासक्रमाची निवड करू शकता, जिथून आपल्याला अभिनयाची पदवी मिळू शकते, कारण व्हॉईस व्होव्हरच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे अभिनय करणे आहे.

कोचिंग अभ्यासक्रम

गेल्या काही वर्षात बऱ्याच खाजगी संस्थांनी व्हॉईस कोचिंग अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टी शिकविण्यात मदत करतात. त्यापैकी काही खाली दिल्या आहेत.

  • इंडियन व्हॉईस ओव्हर, मुंबई.
  • फिलिमेट अकॅडमी, मुंबई.
  • व्हॉईस बाजार, मुबंई.

या व्यतिरिक्त, अनेक प्रस्थापित व्हॉईस ओव्हर कलाकारांनी यासाठी स्वतःचे प्रशिक्षण वर्ग देखील सुरू केले आहेत. आपण गूगल वर सर्च करून आपल्या क्षेत्रातील अशा संस्था शोधू शकता.

संधी कुठे?

मनोरंजन जाहिरात, कॉर्पोरेट, ई-लर्निंग, अ‍ॅनिमेशन, प्रशिक्षण, विपणन, शिक्षण, रेडिओ आणि इतर कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने समृद्ध आवाजासह व्हॉईस-ओव्हर कलाकारांची मागणी वाढत आहे. या व्यतिरिक्त प्रगत तंत्रज्ञानाने व्हिडिओ गेम, अ‍ॅप, जीपीएस, टेक्स्ट टू स्पीच, इंटरनेट सारख्या क्षेत्रात त्यांची मागणी वाढली आहे.

व्यावसायिक करिअर पर्याय म्हणून या व्हॉईस ओव्हर कलाकारांना बाजारात एक सन्माननीय मोबदला मिळतो. त्यामुळे जर तुमचा आवाज गोड असेल तर तुम्ही या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करू शकता.

You might also like
Leave a comment