दुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण!

दुपारी भरपेट जेवण झालं, मन आणि पोट दोन्ही तुडुंब भरलं की, यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच भावना असते, ती म्हणजे वामकुक्षी घेण्याची!

या वामकुक्षी मागे नेमकं कारण काय असतं? जेवण झाल्या झाल्या पटकन बेडवर पडावं असं का वाटतं? यामागे आपली मानसिकता असते की काही शास्त्रीय कारण? याचे उत्तर आज आपण शोधणार आहोत.

दुपारचे जेवण केल्यावर झोप येण्याचं कारण पचनतंत्राशी संबंधित आहे. जेवण केल्यानंतर जेव्हा आपल्या शरीरात पचनक्रिया सुरू होते तेव्हा पचन संस्थेला अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज असते.

अन्न पचवण्यासाठी त्यांना अतिरिक्त एंजाइमचा स्राव करावा लागतो. ही गरज रक्तातून भागवली जाते. अशा स्थितीत रक्तप्रवाह पचनसंस्थांकडे अधिक वळवला जातो.

परिणामी यावेळी मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो. मेंदूमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने मेंदू कमी क्रियाशील होतो. त्याला रात्री वाटते तशी झोपेची गरज वाटू लागते. थकवा आणि आळस येतो आणि त्यामुळे झोपही येऊ लागते.

तर ही आहेत काही शास्त्रीय कारणं दुपारी झोप येण्यामागे! त्यामुळे, वामकुक्षी घ्या पण जास्त वेळ नाही.

You might also like
Leave a comment