या आहेत जगातील सर्वात उंच पर्वतरांगा
आज 11 डिसेंम्बर जागतिक पर्वत दिन. या निमित्ताने जाणून घेऊ जगातील सर्वात उंच पर्वतरांगा आणि त्याबद्दल सर्व काही…!
1) माउंट एव्हरेस्ट
हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असून त्याची उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी आहे. ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
2) के 2
याची उंची 8611 मीटर इतकी आहे. हे शिखर पाक-चीनच्या सरहद्दीजवळ आहे. गिर्यारोहकांमध्ये के 2 पर्वताला जंगली मानले जाते, कारण चढाईसाठी हे शिखर जगातील सर्वात अवघड शिखर मानले जाते.
3) कांचनगंगा
हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के2 नंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. भारतातील या सर्वोच्च शिखराची उंची 8,586 मीटर (28,169 फूट) इतकी आहे.
4) ल्होत्से
हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मीटर (27,940 फूट) आहे. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भागाच्या सीमेवर आहे.
5) मकालू
हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची 8463 मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे.
6) चो ओयू
हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 8,201 मीटर असून, हे पृथ्वीवरील 6 व्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे.
7) धवलगिरी
हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच (उंची 8,167 मीटर) शिखर आहे. इ.स. 1960 साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ वा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले.
8) मानसलू
हिमालयातले मानसलू (उंची 8163 मीटर) हे जगातील 8 व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असेही म्हणतात.
9) नंगा पर्वत
हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील 9 व्या क्रमांकाचा पर्वत असून, त्याच्या शिखराची उंची 8,126 मीटर इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जात असे.
10) अन्नपूर्णा
हिमालयातील 55 किमीच्या अन्नपूर्णा पर्वतरांगेतील अन्नपूर्णा 1 – उंची 8091 मी. हे सर्वोच्च शिखर आहे. हे मध्य नेपाळमध्ये आहे.