अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘लक्ष्मी’ चित्रपट अनेक वादांनंतर आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला.
देशभरात अनलॉक करण्यात येत असून चित्रपटगृहे देखील सुरू करण्यात आली आहेत मात्र अद्याप प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर आज अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे
अक्षय कुमार व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट आज डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
या हॉरर कॉमेडी चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार असून ट्रेलर व गाण्यांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
‘लक्ष्मी’ या चित्रपटाच्या नावावरून बराच वाद झाला. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असं होतं. चित्रपटाच्या नावावर अनेक वेळा आक्षेप घेतल्याने, चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवण्यात आले
अक्षय कुमारची ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ ही निर्मिती संस्था, फॉक्स स्टार स्टुडिओज आणि तुषार कपूर यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.