दिवाळी फराळ करताय? मग ‘हे’ टाळाच!

दिवाळी फराळाचं सर्वांना भलतंच आकर्षक असतं. मात्र फराळ करताना आपल्याकडून आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या काही चूका होतात. या टाळण्यासाठी खालील गोष्टी करा…

  1. चकल्या किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर वर्तमानपत्राचा वापर करू नका. कारण वर्तमानपत्राच्या शाईमध्ये घातक घटक असतात. ते शोषल्यास आणि शरीरात गेल्यास त्रासदायक ठरू शकते. वर्तमानपत्राऐवजी टिश्यू पेपरचा वापर करू शकता.
  2. चिवड्यामध्ये खूप तेल, खोबरं, शेंगदाणे टाळा. त्यांच्याऐवजी भाजलेल्या सुकामेव्याचा वापर करा.
  3. शंकरपाळी करताना साखरेऐवजी गूळाचा वापर करा. यामुळे चवही सुधारायला मदत होईल.
  4. करंज्याची पारी बनवताना मैद्याचा वापर करण्याऐवजी मल्टी ग्रेन पीठाचा वापर करा. बेसनाचा त्रास होत असेल तर रवा आणि सुकामेव्याचा वापर करा.
  5. चकली, शेव तळल्याने त्यामध्ये खूप तेल शोषले जाते. त्याऐवजी बेक्ड शेव आणि बेक्ड चकलीचा पर्याय निवडा.
  6. फराळ बनवताना एकाच दिवशी सारे पदार्थ बनवण्याची घाई करू नका. सतत तळण्याचे पदार्थ किंवा तेलासमोर बसल्यास त्रास होऊ शकतो.
You might also like
Show Comments (1)