आज रात्री 12 वाजल्यापासून Netflix फ्रीमध्ये पाहता येणार

नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. त्यानुसार युजर्स या वीकेंडला चक्क फ्री स्ट्रिमिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत.

Netflix फ्री ऑफर काय? :

  • अमेरिकन कंटेन्ट स्ट्रिमिंग कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रिमफेस्टचं आयोजन करणार आहे. त्याअंतर्गत हि ऑफर आहे.
  • त्यामुळे ज्या युजर्सकडे नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन नाही, अशा लोकांना या स्ट्रिमफेस्टद्वारे नेटफ्लिक्स कंटेन्ट फ्रीमध्ये अ‍ॅक्सेस करण्याची संधी मिळणार आहे.
  • आज रात्री 12 वाजल्यापासून नेटफ्लिक्स फ्रीमध्ये वापरता येणार आहे. हा फ्री ऍक्सेस 6 डिसेंबरपर्यंत असणार आहे. यावेळी कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा पेमेंट डिटेल्स द्यावे लागणार नाही.

Netflix फ्री ऑफर मागचा हेतू

  • अधिकाधिक लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणणे.
  • भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडणे.
  • आपला युजर बेस वाढवणे.

Netflix या पद्धतीने मोफत पाहता येईल!

  • 5 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबर रात्री 12 पर्यंत भारतातील ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध असणार आहे.
  • युजरकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसल्यास युजर नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पासवर्डसह नेटफ्लिक्सच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरून साइनअप करू शकतात
  • या स्ट्रिमिंग फेस्टमध्ये एकदा रजिस्टर्ड केल्यानंतर स्मार्ट टीव्ही, गेमिंग कंसोल, अ‍ॅपल, अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप किंवा वेबवर नेटफ्लिक्सवरच्या सर्व गोष्टी पाहता येणार आहेत.
  • स्ट्रिमफेस्ट सुविधेद्वारे स्टँडर्ड डेफिनेशन सिंगल स्ट्रिमिंगची सुविधा मिळणार आहे.
Leave a comment