
हिवाळा आपल्या सर्वाचा आवडता मौसम. मात्र हा हंगाम आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा आहे. कारण थंडीत इम्यून सिस्टम कमजोर होते. यामुळे अनेक समस्या डोके वर काढतात. त्यावर एक नजर…
● थंडीत ओठ सुखतात. अशात आपण त्यावरून जीभ फिरवतो. यामुळे तात्पुरते बरे वाटते पण ओठ खराब होऊ शकतात. लाळेचे वेगाने बाष्पिभवन होते, यामुळे पहिल्यापेक्षा ओठ जास्त सूखतात.
● तुमचे संवेदनशील दात असल्यास थंडीत वेदना होऊ शकतात. कारण थंड हवा दातांच्या आतील नसांपर्यंत पोहचू शकते आणि दातांना दुखापत करू शकते. यासाठी थंडीत तोंड बंद ठेवा. मास्कने कव्हर करा.
● थंडीत अनेक लोक बीपीच्या समस्येने त्रस्त असतात. एक्सपर्ट आणि डॉक्टर सल्ला देतात की, यासाठी रोज व्यायाम करा. घरात विविध कामे करा.
● थंडीत वजन कमी होते. कारण थंडी लागत असल्याने शरीराला कॅलरी बर्न करणे आणखी सोपे होते. यामुळे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
● थंडीत हवेतील आद्रता कमी होते, त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्याने सुरकुत्या येण्याचा धोका असतो.
● थंडीत कोरड्या हवेतील उन्हामुळे डोळे कोरडे होतात. यामुळे डोळ्यांचे नुकसान होते. यासाठी यूव्ही-ब्लॉकिंग चष्मा घाला.
● थंडीत तहान कमी लागते. लोग पाणी पिण्यास विसरतात. यामुळे डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याच्या कमतरतेची समस्या होते.
Leave a Reply