प्रतिकारशक्ती ते मधुमेह सर्व समस्यांचा एकच उपाय, तांबडा भोपळा!

अनेक वेळा अनेक लोक भाज्या खाण्याबाबत खूपच आवड निवड बाळगणारे असतात. काही काही भाज्या तर पालकच ताटात घेत नाहीत, त्यामुळे घरात मुलांना माहीतच नसतात. तांबडा भोपळा सुद्धा अशीच फळभाजी आहे. त्याचेच गुणकारी फायदे जाणून तुम्ही नक्कीच त्याचा आहारात समावेश कराल!

🫀हृदयविकारात हा तांबडा भोपळा गुणकारी सिद्ध होतो. हृदयात असणारे ब्लॉकेजेस सुद्धा याच तांबड्या भोपळ्याने दूर होतात. यात असणारे कॅरेनॉईट्स हृदयविकाराचे झटके दूर ठेवतात आणि फायबर हृदयाला निरोगी ठेवतात.

मुतखड्याचा विकारात देखील तांबडा भोपळा मदतपूर्ण सिद्ध होतो. भोपळ्याच्या बियांचा गर दुधात टाकून खाल्ल्याने पोटात पेटके येण्याची समस्या दूर होते.

भोपळ्यात व्हिटॅमिन ए, इ, सी असते. आयर्न सुद्धा मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

वाफवलेले भोपळ्याचे काप खाल्ल्याने शरीराची फायबरची गरज पूर्ण होते. त्यामुळे पचनमार्गात येणारे अडथळे दूर होतात. पोट निरोगी राहते. आम्लपित्त नष्ट होते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

तांबडा भोपळा तुमच्या डोळ्यांचे आरोग्य राखून रोज भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए तुम्हाला देतो. मधुमेही लोकांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. इन्सुलिनची निर्मिती नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*