जाणून घ्या जेवणानंतर शतपावली आणि वामकुक्षीचे महत्त्व

जेवणानंतर शरीर सुस्तावून लागते मात्र तरीदेखील जेवणानंतर लगेचच झोप नाही आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे असते. तर यावेळी ‘शतपावली करणे’ फायदेशीर ठरते.

शतपावली या शब्दातूनच किती पावले चालावीत, याचा संकेत दिलेला आहे. शत म्हणजे शंभर, किमान शंभर पावले तरी चालावीत असे आरोग्यशास्त्र सांगते.

शतपावली घातल्याने जी शारीरिक हालचाल होते, त्यामुळे शरीर सैल आणि हलके होते. चालण्याचा थोडासा व्यायाम झाला म्हणजे डोळ्यावर येणारी पेंग कमी होते. यासाठी केवळ जेमतेम दहाच मिनिटांचा कालावधी लागतो.

या शतपावली नंतर शरीराला आराम देणारी एक छोटीशी झोप घ्या म्हणजेच वामकुक्षी घ्या झोपेसाठी डाव्या कुशीवर आडवे व्हावे. आपल्या डाव्या हाताची डोक्‍याखाली उशी करावी. डाव्या हाताची उशी डोक्‍याखाली घेऊन डाव्या बाजूस वळून झोपणे याला ‘वामकुक्षी’ घेणे असे म्हणतात.

शतपावलीचे व वामकुक्षीचे फायदे:

  • पोटातील पाचनरसाचे प्रमाण वाढते.
  • पचनक्रिया जलद होते.
  • अपचनाचा त्रास दूर होतो.
  • आम्लरस न वाढता शरीर ताजे व अधिक कार्यक्षम होते.
  • रक्तदाब व हृदयविकारावर परिणामकारक.
  • शारीरिक आणि बौद्धिक विश्रांती मिळते.
  • स्मरणशक्‍ती, एकाग्रता वाढण्यास मदत होते.
You might also like
Leave a comment