या आहेत ह्रदयासाठी घातक गोष्टी
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या ह्रदयाची कळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या काही सवई बदलुन आपण आपले ह्रदय निरोगी ठेऊ शकतो.
तासनतास टीव्ही पाहणे
एका जागेवर बसून तासनतास टीव्ही पाहणे हे स्मोकिंग सारखे घातक आहे. एक्सपर्ट्स सल्ला देतात कि, 30 मिनिटानंतर आपल्या शरीराची हालचाल झालीच पाहीजे. एकाच जागी बसून राहिल्याने शरीर सुस्थ/आळशी बनत. यामुळे ह्रदयाचे आजार होऊ शकतात.
जास्त मीठ खाणे
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील अधीक पाणी रक्तामध्ये जाउन मिसळते, त्यामुळे रक्त पातळ होउन ह्रदयावर दबाव वाढतो. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो.
पूर्ण झोप न घेणे
शांत चित्ताने पूर्ण झोप न घेतल्यास हाई ब्लड प्रेशरचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासोबतच रात्रभर जागरण केल्यामुळे आपले शरीर तणावपूर्ण अवस्थेत जाऊ शकते.
जास्त कामाचा दबाव
आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यास शरीर थकून जात ज्यामुळे आपल्या ह्रदयातील रक्त धमण्यावर दबाव येऊन त्या खराब होऊ शकतात. त्यामुळे शरीरावर परीणाम होईल ईतके काम करू नये.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.