हसण्याचे फायदे – चला..जगणं सुंदर करूया, काही वेळ हसूया, हसवूया
हसण्याने आरोग्य चांगले राहते असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आपणही सतत हसतमुख राहीलो आणि त्याचे काय फायदे होतात, हे पाहिलं तर?
हसण्याचे फायदे
- आतापर्यंत तुमचा स्वभाव हा विनोदासाठी, हास्यासाठी फारसा पोषक नसला तरी तो तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर बदलू शकता.
- तणाव, दुःख, असेल तर हास्य हे औषधासारखे काम करेल. मन, शरीर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी, दुःखातून बाहेर येण्यासाठी हास्यासारखा उपाय नाही.
- हास्यामुळे मनावरील दबाव कमी होतो. हास्यामुळे प्रसन्नता जाणवते, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य सुधारते.
- रक्ताभिसरण सुधारते. हृदयविकार होण्यापासून बचाव होऊ शकतो. हसण्यामुळे तणाव वाढवणारे हार्मोन्सही कमी होतात.
- हास्यामुळे शरीर, चेहऱ्यावरील नसा ताणल्या जातात. त्यांना व्यायाम मिळतो. नाडीचे ठोके सुधारतात. श्वास अधिक घेतला गेल्याने ऑक्सिजन मिळतो.
- विचार सकारात्मक, आशादायी होतात. साहस व शक्ती वाढते. सर्जनशीलता वाढते. आनंद भेटतो. भीती, अस्वस्थता कमी होते. मूड चांगला राहतो.
हसण्यामुळे शरीरातील एडोरफिन्स् हार्मोन्स् वाढतात. मेंदुला छान वाटायचे काम हे रसायन करते. त्यामुळे काही काळासाठी दुखण्याची, दुःखाची भावना कमी करते. हृदयाचे सरंक्षण करते. रक्तवाहिन्यांचे काम सुधारते.