थंडीत अंगाला खाज सुटल्यावर ‘हे’ करा!
थंडीची दिवसात आपली त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान नखाने खाजविल्याने तेथे जखम होऊन ती जडू शकते. यामुळे असे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे थंडीत त्वचेवर येणाऱ्या खाजेचा त्रास कमी करता येईल. त्याबाबत माहिती पाहुयात….
● कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने स्नान केल्यास खाज कमी होते.
● तुळशीची पाने पाण्यात मिक्स करुन त्याचा लेप बनवून तो खाज येत असलेल्या भागावर चोळा. आराम मिळेल.
● कोरफडीतील हर त्वचेवर चोळल्यासही खाज कमी होण्यास मदत होते.
● फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.
● तुम्हाला त्वचेच्या ज्या भागावर खाज येत आहे तिथे लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब टाका आणि ती जागा वाऱ्यायाखाली सुकवा. खाज कमी होईल.
जर तुमच्याकडे वरील काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही दुकानातून मॉयश्चरायजर आणून देखील खाज कमी करु शकता.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.