टाचांच्या वेदनांसाठी फायदेशीर व्यायाम | टाच दुखीवर उपाय
अनेकांना टाचांचे दुखणे सतावत असते अनेक उपचार करून देखील दातांचे दुखणे थांबत नाही यासाठी काही योगासने फायदेशीर ठरतात. जाणून घ्या ही योगासने कोणते आहेत
उष्ट्रासन
या आसनामध्ये शरीराची मुद्रा उंटाप्रमाणे करावी लागते त्यामुळे याला उष्ट्रासन म्हणतात. यासाठी गुडघ्यावर बसा, त्यानंतर गुडघ्यावर उभे राहा आणि शरीराला मागे नेत हाताने टाचांना स्पर्श करा, यावेळी दीर्घ श्वास घेत रहा.
गोमुखासन
या आसनामध्ये शरीराची मुद्रा गाईच्या मुखाप्रमाणे करावी लागते त्यामुळे याला गोमुखासन म्हणतात. यासाठी जमिनीवर बसा, उजवा पाय गुडघ्यापासून वाकून डावीकडे न्या, या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा डावा हात उचलत कोपऱ्याने दुमडून मागे घ्या, उजवा हात कमरेपासून मागे नेत डावा हात धरण्याचा प्रयत्न करा या अवस्थेमध्ये २० ते ३० सेकंद रहा.
बालासन
या आसनामध्ये गुडघ्यावर बसा हात वर नेत जमिनीवर वाका जमिनीवर टेकवा तळहात जमिनीवर वळवा या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. या आसणांमुळे टाचांच्या वेदनेपासून आराम मिळतो.