जागतिक तंबाखू विरोधी दिन | World No Tobacco Day

दरवर्षी 31 मे रोजी जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि जागतिक भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1988 मध्ये प्रथम जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला. World Health Assembly ने 1987 रोजी धुम्रपान न करण्याचा दिवस म्हणून संबोधण्याचा ठराव संमत केला आणि पुढच्या वर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखूजन्य दिन साजरा करण्याचे आव्हान ठराव संमत केले.

थीम : Commit to Quit

यवुकांचे उद्योगातील हेराफे रीपासून त्यांचे संरक्षण आणि तंबाखू व निकोटीनच्या वापरापासून
रोखण्याकडे लक्ष असेल. विशेषतः असे दिसून आले की धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना व्हायरसचा गंभीर घटनेचा धोका जास्त प्रमाणात असतो. तंबाखूच्या वापरामुळे हृदय, फूफ्फुस, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, डोळे, हाडे, दात यांसह अनेक अवयवांवर गंभीर परिणाम होतात. परिणामी यांचे रूपांतर हृदयरोग, फु फ्फूसाचे रोग, पक्षाघात, कर्क रोग इत्यादी गंभीर आजारांमध्ये होतो.

महत्व

जगभरातील धुम्रपान करणारे आणि धुम्रपान न करण्याऱ्यांसाठी हा विचार आणि प्रतिबिंब करण्याचा दिवस आहे.

उद्दिष्ट्ये

सार्वजनिक तंबाखु वापरण्याचे धोके आणि तंबाखू कंपन्यांचा व्यवसाय पद्धतीबद्दल माहिती देण्याचे कार्य जागतिक आरोग्य सं घटना करते.

उपाय

WHO Framework Convention on Tobacco Control (WHO FCTC) हा एक करार आहे, जो 21 मे 2003 रोजी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आयोजित 56 व्या जागतिक आरोग्य सभेने स्विकारला. FCTC हा WHO चा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे.
हा करार 27 फेब्रुवारी 2005 रोजी लागू झाला. त्यावर 168 देशांनी स्वाक्षरी के ली होती आणि WHO च्या कायद्यानुसार 181 समर्थक देशांमध्ये बंधनकारक असेल.

FCTC अंतर्गत उपाययोजना

  1. तंबाखूची मागणी कमी करण्यासाठी किंमत आणि कराचे उपाय.
  2. तंबाखूच्या धुराच्या प्रदर्शनापासून सं रक्षण.
  3. तंबाखूजन्य पदार्थांच्या सामग्री आणि प्रकटीकरणाचे नियमन.
  4. शिक्षण, संप्रेषण, प्रशिक्षण आणि जनजागृती.
  5. जाहिराती आणि प्रायोजकत्व.

तंबाखू नियंत्रणाबाबत भारत सरकारचे प्रयत्न

2007-08 च्या 11 व्या पंचवार्षिक योजनेत “राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP- National Tobacco Control Program)” सुरू केला.

NTCP कार्यक्रमाचा मुख्य उद्देश

तंबाखू सेवनाच्या हानिकारक प्रभावांविषयी जागरूकता निर्माण करणे. उत्पादन कमी करणे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

mCessation Programme

मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर तंबाखू निर्मूलनासाठी करण्याचा हा उक्रम आहे. 2016 मध्ये भारत सरकारने Digital India उपक्रमाचा एक भाग म्हणून भारताने मजकूर संदेशाचा वापर करून mCessation सुरू केले. NTCP आणि केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने WHO व आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ यांच्या मदतीने “Be Healthy, Be Mobile” हा उपक्रम राबवला.

You might also like
Leave a comment