थंडीत फायदेशीर हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्स
गेल्या काही दिवसांपासून थंडी हळू-हळू वाढतेय. अशात थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही गरम कपडे काढले असतील. पण रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात काही बदल करा. त्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा आहारातील समावेश वाढवा करायला हवा. त्यावर एक नजर…
हळदीचं दूध
सर्दी, खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ‘हळदीचं दूध’ हे आजीबाईच्या बटव्यातील औषध आहे. हळदीचं गरम दूध शरीरात उष्णता निर्माण करण्यास तसेच रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यास मदत करतात.
मसालेदार चहा
या वातावरणात मसाले चहा किंवा गरम मसाल्याचा वापर करून तयार केलेला काढा/ चहा फायदेशीर आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. जर चहा पिण्याचे प्रमाण वाढवणार असाल तर साखरेऐवजी गूळाचा वापर करा. कारण हा हेल्दी पर्याय आहे.
डाळ आणि शोरबा
प्रोटिनयुक्त डाळीच्या जोडीला भाज्या असल्यास शरीरात एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. हिवाळ्याच्या दिवसात यामुळे उष्णतादेखील निर्माण होते.
सूप
हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यास आणि वारंवार लागणार्या भूकेला नियंत्रणात ठेवण्यासाठी सूप्स हा हेल्थी पर्याय आहे. तसेच सूप्स झटपट तयार होत असल्याने त्याचा आहारात हमखास समावेश करा.
हर्बल कॉफी
कॅफिनचा शरीरात अधिक प्रमाणात मारा झाल्यास आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी कॉफीचे सेवन करणार असाल? तर हर्बल कॉफीचा पर्याय निवडा.