19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन

आश्चर्य वाटलं ना जागतिक पुरुष दिन ऐकून! हो 19 नोव्हेंबर हा दिवस दर वर्षी जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो किंवा मानला जातो.

जागतिक पुरुष दिन का साजरा होतो?

पुरुषांसोबत होणारा भेदभाव, शोषण, हिंसा रोखण्यासाठी, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक पुरुष दिनाची सुरुवात

सर्वात प्रथम 7 फेब्रुवारी 1992 ला अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या काही देशांमध्ये जागतिक पुरुष दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. मात्र 1995 पासून हा दिवस साजरा होणे बंद होत गेले. पुढे 1998 साली त्रिनिदाद आणि टोबॅगो मध्ये पुन्हा एकदा 19 नोव्हेंबर डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी हा दिवस सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे हळू हळू 70 देशांमध्ये हा दिवस पुरुष दिवस म्हणून मानला जाऊ लागला आणि युनेस्कोने पण या दिवसाला मान्यता दिली.

भारतात सेव्ह इंडियन फॅमिली या फाउंडेशनने 2007 साली सर्वात आधी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. पुढे ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर फाउंडेशनने महिला विकास मंत्रालयासारखं पुरुष विकास मंत्रालय सुरु व्हावं हि सुद्धा मागणी केली आणि जागतिक पुरुष दिन सर्वांना माहित व्हावा यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.

पुरुषांनो नैराश्यात न राहण्यासाठी करा असं काही

  • कुटुंबाला वेळ द्या, सुटीच्या दिवशी फिरायला जा.
  • नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
  • आपली अडचण, समस्या बोलून दाखवा.
  • मित्र, नातेवाइकांसोबत गप्पा मारा.
  • शक्‍य असल्यास जबाबदारीचे योग्य नियोजन करा.

आदर्श पुरुष होण्यासाठी कोणते गुण असायला हवेत?

भाषा व देहबोली सॉफ्‍ट हवी

कठोर, जबाबदार, धाडशी, हे शब्‍द पुरुष असल्‍याचा दाखला देतात. कधी कुणासमोर न झुकणे अशा गोष्‍टी पुरुषपणाशी जोडल्‍या जातात. मात्र पुरुष असण्‍याचा व कठोरपणाचा काहीही संबंध नाही. परफेक्‍ट मॅन तोच असू शकतो ज्‍याची भाषा व देहबोली सॉफ्‍ट असते.

प्रोटेक्टिव बना

प्रत्‍येक पुरुष आपल्‍या घरातील स्‍त्रियांसाठी संवेदनशील असतात. त्‍यांच्‍या जबाबदारी, संरक्षणासाठी ते काहीही करण्‍यास तयार असतात. मात्र हे करत असताना आपण पजेसिव तर बनत नाहीना याकडे लक्ष द्यावे. पजेसिव बनू नका तर प्रोटेक्टिव बनणे हेच परफेक्‍ट मॅनचे लक्षण आहे.

वेळ द्या

घर-संसारासाठी स्‍त्रियांना आपल्‍या इच्‍छा-अकांक्षावर पाणी सोडावे लागते. मात्र पुरुषांनी आपल्‍यातील पुरुषी अंहकार बाजूला ठेवल्यास अशा गोष्‍टी टाळता येतील. कामातून वेळ काढून पत्‍नी, मुलांसोबत घालवावा.

मदत करा

घर, मुले सांभळण्‍याची जबाबदारी फक्‍त स्‍त्रियांची असते, असे अनेकांना वाटते. मात्र कुंटुबाची जबाबदारी ही दोघांची असते. स्‍त्रियांनीच घर व मुले सांभाळण्याची जबाबदारी न घेता पुरुषांनीही ही जबाबदारी घ्यावी.

चला परफेक्‍ट मॅन बनण्याचा प्रयत्न करूया, अधिक जबाबदारपणे बनून अधिक उत्साहाने पुरुष दिन साजरा करूयात…

Leave a comment