मकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.?

‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तिळाचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्याला पुढील अनेका फायद्यांमुळे समजेलच..!

  1. अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
  2. त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते.
  3. ज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
  4. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
  5. तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.
  6. थंडीमध्ये आपण भाजीला शेंगदाण्याचा कूटाऐवजी तीळाच्या कूटाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो.
  7. थंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले.
  8. बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे.
  9. ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.
  10. दातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.

(सदर माहितीनुसार, तिळाचे सेवन कितपत फायदेशीर आहे, हे आपल्या शरीरावर अवलंबून असते, याची काळजी घ्यावी.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*