दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? मग वाचाच

आपण स्वयंपाकघरातील महिलांना बर्‍याच वेळा स्वयंपाकघरात दूध उकळताना पाहिले असेल. काही स्त्रियांना असे वाटते की, भरपूर वेळ दूध उकळवल्याने त्यातील पोषकद्रव्ये वाढतात. परंतु, आपणसुद्धा असाच काहीतरी विचार विचार करून, दिवसातून अनेक वेळा दूध उकळवत असाल, तर मग तुम्ही मोठी चूक करत आहात. ते कसे? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात…

वास्तविक दूध बराच काळ किंवा बऱ्याच वेळा उकळवून घेतले तर, त्यातील पोषकद्रव्य नष्ट होऊ लागतात, हे बऱ्याच संशोधनात सिद्ध झाले आहे. अशा दुधाने शरीराला काहीच फायदा होत नाही.

दूध उकळण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते गरम होत असताना, चमच्याने सतत ढवळत राहाणे. सतत ढवळल्यानंतर दूध उकळले की गॅस बंद करावा.

पुन्हा पुन्हा दूध उकळण्याची चूक करू नका. जितक्या जास्त वेळा ते उकळले जाईल, तितके त्यातील पोषक घटक नष्ट होतात. म्हणून दूध शक्यतो फक्त एकदाच उकळण्याचा प्रयत्न करा.

दूध सेवन करताना लक्षात ठेवा!

  • जेवणानंतर नियमित दूध पित असाल, तर अर्ध पोटीच जेवा. अन्यथा पचनक्रिया संबंधित त्रास उदभवू शकतात.
  • कांदा आणि वांग्यासोबत कधीही दुधाचे सेवन करु नये. यामधील घटक एकमेकांत मिसळून त्वचेच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.
  • कधीही मासे किंवा मांस खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन करू नये. यामुळे विविध आजार होऊ शकतात.
  • जेवण झाल्यावर लगेच दूध पिऊ नये. खाल्लेले अन्न पचण्यास काही वेळ लागतो आणि पटकन दूध प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*