नैसर्गिक घटकांचा वापर करून करा घरगुती फेशियल!

वयाची तिशी ओलांडल्यानंतर त्वचेत होणारे बदल अगदी ठळकपणे जाणवू लागतात. दर वेळी पार्लरमध्ये खर्च करून त्वचा व्यवस्थित करून घेणे देखील आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. घरगुती आणि नैसर्गिक घटक वापरून तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर त्वचा खराबच होणार नाही. आज आपण नैसर्गिक घटकांचा वापर करून घरगुती फेशियल कसे करायचे हे जाणून घेऊ.

क्लीन्जिंग

चेहऱ्यावरील धूळ, माती आणि घाण स्वच्छ करण्यासाठी प्रथम क्लीन्जिंग केले जाते. यासाठी आपण हायड्रेटिंग क्लीन्सरची निवड करा. हार्ड क्लीन्सरचा उपयोग अजिबात करू नका.

स्क्रबिंग

फेशिअलची दुसरी पायरी स्क्रबिंग आहे. यामध्ये चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकली जाते. याला एक्सफोलिएशन असेही म्हणतात. मध, साखर आणि थोडे मीठ एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि तीन ते चार मिनिटे चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

टोनिंग

गुलाबाच्या पाण्याने देखील टोनिंग केले जाते. परंतु, चांगल्या टोनिंगसाठी तांदळाच्या पाण्याचा बर्फ तयार करून त्याचा वापर करा. स्क्रब केल्यावर त्याने चेहऱ्यावर चांगला मसाज करा.

मसाज

फेशिअलची चौथी पायरी म्हणजे फेस मसाज, ज्याची या प्रक्रियेत सर्वात मोठी भूमिका आहे. यासाठी नैसर्गिक कोरफड जेल वापरा. सुमारे 10 ते 15 मिनिटे या जेलने चेहऱ्यावर मसाज करा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

फेस पॅक

फेसपॅक चेहऱ्याला सर्वात शेवटी लावला जातो. त्यासाठी मसूर डाळ रात्री भिजवा. सकाळी त्यात थोडे दूध मिसळून जाडसर पेस्ट बनवा. दोन थेंब लिंबूसर घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावा. याशिवाय आपण बेसन पिठामध्ये चिमूटभर हळद, मध आणि मलई घालून देखील फेस पॅक बनवू शकता. जर चेहरा तेलकट असेल तर मलईऐवजी दुधाचा वापर करा.

You might also like
Leave a comment