आहारातील ‘या’ गोष्टींमुळे वाढू शकतं थायरॉईड…

आजकाल अनेकांना थायरॉईडची समस्या होत असल्याचं समोर येतं. थायरॉईडमध्ये वजन वाढण्याससह किंवा कमी होण्यासह हार्मोन्सचं असंतुलनही होतं.

या गोष्टींचे सेवन टाळा

कोबी, फ्लॉवर

कोबी, फ्लॉवरमध्ये guitornoids नावाचं तत्व अधिक प्रमाणात आढळतं.

त्यामुळे थायरॉईडची समस्या वाढू शकते. त्यामुळे थायरॉईड असलेल्या लोकांनी या दोन भाज्या खाणं टाळावं

सोयाबीन

सोयाबीनमध्ये guitornoids असतं, जे थायरॉईडचा आजार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं.

सोयाबीन अधिक प्रमाणात खाल्यास शरीरात थायरोक्सिन वाढतं. थायरोक्सिन वाढल्याने थायरॉईडची समस्याही अधिक वाढते.

मीठ

थायरॉईडच्या ग्रंथी मीठाचा वापर करुन थायरोक्सिन हार्मोन्स बनवतात. त्यामुळे शरीरात आयोडिनची कमतरता झाल्यास, थायरॉईडच्या ग्रंथी वाढू लागतात.

त्यामुळे आयोडिन मीठ मर्यादेत खाण्याचा सल्ला दिला जातो. सैंधव मीठाचा आहारात वापर करु शकतात.

Leave a comment