रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आरोग्यदायी ब्राह्मी
आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पती आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे सांगितले आहे यामध्ये ब्राह्मी या वनस्पतीमुळे केसांच्या आरोग्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
ब्राह्मीचं सेवन केल्याने यातील अँटिऑक्सिडंटमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो.
ब्राह्मीच्या सेवनाने मेंदूची ताकद वाढते. त्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये एकाग्रता निर्माण होण्यास मदत होते.
त्याचबरोबर ब्राह्मीचं सेवन केल्याने हार्मोनल बॅलन्स होते. कार्टीसोल स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते. त्यामुळे तणाव मुक्तीसाठी मदत होते.
दररोज ब्राह्मीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. आणि हायपोग्लायसिमियाची समस्या कमी होण्यास मदत होते.