मकर संक्रांत; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे विशेष महत्व
मकरसंक्रांत म्हणजे, जानेवारीत येणार पहिला सण.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत असं म्हणतात.
मकर संक्रांतचा शुभ मुहूर्त
यावर्षी मकर संक्रांतला पूजा करण्यासाठी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 ही वेळ शुभ आहे. त्यामुळे तुम्ही या वेळेत पूजाविधी करु शकता.
नेहमी 14 जानेवारीलाच का?
हा एकमेव असा सण आहे जो एकाच तारखेला येतो. कारण कि, हा एकमेव सण आहे जो सूर्याच्या स्थानानुसार साजरा केला जातो. इतर सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर साजरे केले जातात. त्यामुळे इतर सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखांना साजरे करण्यात येतात.
तीळ-गुळाचे महत्त्व काय?
संक्रांतला तीळ आणि गूळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरुन त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते.
काळे कपडे का परिधान केले जाते?
संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्त्रांना महत्त्व दिले जाते. कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळ्या वस्त्रांचा या दिवशी वापर केला जातो.