बॉडी बिल्डींग क्षेत्रात वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय महिला
आपल्यापैकी फारच कमी जणांना महिला बॉडीबिल्डर्सबद्दल माहिती असेल. त्याचं कारण म्हणजे आजही आपल्या समाजात महिला बॉडीबिल्डर्सकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजात म्हणावा तसा मान दिला जात नाही.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भारताच्या 9 महिला बॉडीबिल्डर्सशी भेट घडवून आणणार आहोत, ज्यांनी ‘स्त्रिया देखील पुरुषांपेक्षा कमी नाही’ हे दाखवून दिले आहे.
यशमीन चौहान मनक
बॉडी बिल्डिंग आणि वेट लिफ्टिंग क्षेत्रातील ओळखीचे नाव म्हणजे यशमीन चौहान मनक. तिला ‘आयरन लेडी’ म्हणून देखील संबोधले जाते. यशमीनने 2005 मध्ये ग्लेड्राॅग्स मिसेस इंडिया हा पुरस्कार जिंकला. तसेच बुलंदशहर येथे आयोजित आयबीबीएफएफ स्पर्धेत तिने दोन प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
करुणा वाघमारे
करुणा वाघमारे ही भारताची प्रथम आंतरराष्ट्रीय स्तराची बॉडीबिल्डर आहे. अॅमेच्योर ऑलिम्पियामध्ये पदक जिंकणारी ती देशातील पहिली बॉडीबिल्डर आहे. याशिवाय बॉडीबिल्डिंगमध्ये (शरीरसौष्ठव मध्ये) शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर्स संघराज्य (आयएफबीबी) ती पहिली महिला फिजिक अॅथलिट आहे.
सरिता देवी
सलग तीन वर्षे राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद जिंकणारी सरिता पहिली भारतीय महिला आहे. ती एक प्रसिद्ध बॉक्सर देखील आहेत. 2015 मध्ये तिने वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच 2015 आणि 2016 मध्ये एशियन बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक देखील जिंकले.
सोनाली स्वामी
“लेडी सलमान” म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली स्वामी आंतरराष्ट्रीय फिटनेस अॅथलीट आणि उद्योजक आहे. 2014 मध्ये सोनालीने ‘फिट फॅक्टर शो’ जिंकला. तसेच 2015 च्या मसलमेनिया स्पर्धेत 2 सुवर्ण जिंकले. थायलंडमधील वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ती पहिल्या दहामध्ये होती.
अंकिता सिंग
अंकिता बॉडीबिल्डिंगची आंतरराष्ट्रीय खेळाडू असून ती 2014 पासून हा खेळ खेळत आहे. 2014 मध्ये अंकिताने फिटनेस प्रकारातील वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये पाचवे स्थान मिळवले. 2015 मध्ये मिस इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत तिसऱ्या आणि 2016 मध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली.
दीपिका चौधरी
जागतिक महिला बॉडी बिल्डिंग 2012 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपिकाने एप्रिल 2015 मध्ये अमेरिकेचे इंटरनॅशनल फिगर अॅथलिट कॉम्पिटिशन आपल्या नावे केले. ‘बॅटल ऑफ द बीच’ हा प्रतिष्ठीत पुरस्कार जिंकून दीपिकाने देशाचे नाव जगभरात उज्ज्वल केले. इतकेच नाही तर ती एक विषाणूशास्त्रज्ञ देखील आहे.
किरण डेंबला
किरण डेंबला एक प्रसिद्ध बॉलीवूड फिटनेस ट्रेनर असून तिनेअनुष्का शर्मा पासून तमन्ना भाटीया पर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींना ट्रेनिंग दिलेले आहे. 2013मध्ये तिने बुडापेस्ट येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड बॉडी ब्लिडिंग चॅम्पियन’शिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले आणि सहावा क्रमांकही पटकावला.
श्वेता मेहता
हरियाणाची श्वेता मेहता 2017 साली एमटीव्ही रोडीजचा 14 वा सीझन जिंकून चांगलीच चर्चेत आली होती. जगातील सर्वोत्तम फिटनेस अॅलीट्समध्ये श्वेताचे नाव घेतले जाते. तिने 2016 मधील जेराई महिला फिटनेस मॉडेल चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले होते.
ममोता देवी
तीन मुलांची आई असलेली ममोता देवी पहिल्या भारतीय महिला आहेत जिने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉडी बिल्डिंग मध्ये पदके मिळवली आहेत. ममोता देवी आणि तिचे पती हे असे एकमेव जोडपे आहे ज्यांनी भारतासाठी महिला व पुरुष गटामध्ये एशियन टायटल विजेतेपद मिळवले आहे.