जाणून घ्या ज्योतिबांचे हे प्रेरणादायी विचार

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.

शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

जाणून घेऊयात महात्मा जोतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार

  • प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते.
  • नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
  • भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसच आहे.
  • समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
  • ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात.
  • जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.
  • विद्वेविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.
  • जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे.
  • मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा, ज्योती म्हणे.
Leave a comment