PMMSY : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि ई-गोपाला अ‍ॅप

10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) याचा शुभारंभ करण्यात आला.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

ही देशातली मत्स्यउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चालविलेली एक महत्वाकांक्षी योजना असून आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 अश्या 5 वर्षांच्या कालावधीत त्याच्या अंमलबजावणी केली जाणार आहे.

अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रातली आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे.

एकूण निधीपैकी सागरी, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि जलशेती या क्षेत्रातल्या लाभार्थीभिमुख उपक्रमांसाठी 12340 कोटी रुपये तर मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी सुमारे 7710 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

ही योजना मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता, गुणवत्ता, तंत्रज्ञान, सुगीनंतरची पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन, आधुनिकीकरण आणि मूल्य साखळी, शोध क्षमता मजबूत करणे, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाची चौकट आणि मत्स्यपालकांच्या कल्याणासंबंधी समस्या सोडविण्यासाठी तयार केली आहे.

योजना प्रामुख्याने ‘क्लस्टर किंवा क्षेत्र आधारित दृष्टिकोन’ अवलंबण्यावर आणि मत्स्यव्यवसाय क्लस्टर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. समुद्री शैवाल आणि शोभेच्या माशांच्या लागवडीसारख्या रोजगारनिर्मिती उपक्रमांवर विशेष भर दिला जाणार आहे.

सीतामढी येथे फिश ब्रूड बँक आणि किशनगंज येथे एक्वाटिक डिसीझ रेफरल प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे.

या सुविधा मासे उत्पादकांना वेळेवर गुणवत्तापूर्ण व परवडणारी फिश सीड उपलब्ध करून देऊन उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करणार तसेच रोगाचे निदान करण्याची आणि पाणी व माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज पूर्ण करणार.

योजनेची उद्दिष्ट्ये

2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत मत्स्यउत्पादन अतिरिक्त 70 लक्ष टनाने वाढवणे.2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत मत्स्यपालन निर्यात महसूल 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे.मत्स्यपालक आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.

मत्स्यव्यवसायात होणारे नुकसान 20-25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करणे.मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित कामांमध्ये अतिरिक्त 55 लक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदेशीर रोजगाराच्या संधी निर्माण करणे

ई-गोपाला अ‍ॅप…

e-Gopala app | ई गोपाला

e-Gopala app Download link

‘ई-गोपाला अ‍ॅप’चे देखील उद्घाटन करण्यात आले. हे मोबाइल अ‍ॅप शेतकऱ्यांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती मंच आहे.

सर्व प्रकारचे (वीर्य, भ्रूण इत्यादी) रोगमुक्त जंतुनाशक खरेदी व विक्री यासह; दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता (कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय प्रथमोपचार, लसीकरण, उपचार इ.) आणि पशु पोषण, योग्य आयुर्वेदिक औषध / प्राण्यांच्या पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासह पशुधनाचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्या देशात डिजिटल व्यासपीठ उपलब्ध नाही.

लसीकरण, गर्भधारणेचे निदान, वासराचा जन्म याच्या तारखांबाबतची माहिती देण्यासाठी तसेच विविध शासकीय योजना व मोहिमेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याची कोणतीही यंत्रणा नाही. हे अॅप या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना उपाययोजना पुरविणार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*