T20 मध्ये नवीन नियम; आता 12वा खेळाडू करू शकतो बॅटिंग / बॉलिंग

इंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) 13वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आता सर्वांना बिग बॅश लिगची उत्सुकता लागली आहे.

आता तर या लीगमध्ये भारताचा युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तीन नवीन नियम आणले आहे.

IPL चे 3 नवीन नियम

Power Surge

या नियमानुसार 6 षटकांचा पहिला पॉवर प्ले हा 4 षटकांचा केला गेला आहे. उर्वरित 2 षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना 11व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील 2 षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त 2 खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.

X-factor Player

आता कर्णधारांना 11 खेळाडूंची नव्हे तर 12 किंवा 13 खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या 10व्या षटकानंतर 12 वा किंवा 13 वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम 11 मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो, ज्याने फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.

Bash Boost

जर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या 10व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या 10 षटकांत केल्या, तर त्यांना 1 बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं 10 षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*