दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) का साजरा केला जातो ?

दिवाळीत येणाऱ्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केल्या जाणाऱ्या दिवसाला ‘दिवाळी पाडवा’ असे म्हटले जाते. तसे दिवाळी पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ असे ही संबोधले जाते.

यावेळी दिवाळी पाडवा 16 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार असून हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून कोणतेही शुभ काम करण्याची प्रथा परंपरेने चालत आली आहे.

तसेच हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच या दिवशी बलि आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होते.

त्याचसोबत व्यापाऱ्याच्या नव्या वर्षाला ही या दिवसापासून सुरुवात होते. तसेच जमिनीवर या दिवशी पंचरंगी रांगोळी सुद्धा काढली जाते. एवढेच नाही तर विवाहित महिला या दिवशी पतीला अभ्यंगस्नानानंतर औक्षण करतात.

बलिप्रतिपदेचा इतिहास

  • असूरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊन सुद्धा चारित्र्यवान, विनयशील आणि प्रजादक्ष राजा म्हणून बळीराजाला ओळखले जायचे. दानशूर म्हणून ही हा राजा जगविख्यात होता.
  • पण त्याने वाढत्या शक्तींच्या जोरावर देवांचे परावभ केले. त्यामुळे बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूंची निवडण करण्यात आली. भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण करत बटूवेशात बळीराजासमोर उभे राहिले.
  • या रुपात वामनने तीन पावले भुमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली त्यावेळी वामन अवतारातील विष्णूंनी प्रचंड रुप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले.
  • तिसरे पाऊल ठेवण्यासाठी दागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्ती बळीराजाने मस्तक पुढे ठेवले. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवत वामनांनी त्याला पाताळाचे राज्य दिले. अत्यंत दानशूर पण दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन पाताळात गाडल्याचा हाच तो दिवस.
You might also like
Leave a comment