जाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे
कापूर जाळणे धार्मिक परंपरांमध्ये एक विशेष महत्त्वाचे आहे. मात्र हाच कापूर जाळण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कापूर फक्त पूजेसाठी नाही तर इतर गोष्टींसाठी देखील फायदेशीर ठरतो.
यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचा कापूर वापरला जातो. यामध्ये एक कापूर पूजेसाठी तर दुसरा म्हणजे जो कपड्यांमध्ये ठेवण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर औषध निर्मिती साठी देखील कापूरराचा वापर केला जातो.
कापूरामध्ये अँन्टीबॅक्टेरीयल गुणधर्म तसेच इतर आजरांवर देखील कापूर उपयुक्त ठरतो. यामध्ये डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनची साल आणि पांढरं चंदन समान प्रमाणात बारीक करून त्याची पेस्ट डोक्याला लावल्यास आराम मिळतो.
दुधात कापूर मिसळून डोळ्यांमध्ये काजळाप्रमाणे लावल्यास डोळ्यांच्या समस्येवर लावल्यास आराम मिळतो. चेहऱ्यावरील पुरळ आणि पुरळाचे डाग यावर कापूराचे तेल लावल्यास पुरळ आणि डाग दोन्ही जाण्यास मदत होते.
त्याचबरोबर मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत होते. केस गळती, केसात कोंडा, या समस्यांसाठी कापूर फायदेशीर ठरतो. त्यामुळे कापूर हा धार्मिक आणि आरोग्य यासाठी उपयुक्त ठरतो.