शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा

निरोगी शरीरासाठी प्रत्येकाच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन कमी झालं तर, गंभीर त्रास होतात.

यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे याबाबत सांगणार आहोत

डाळिंब

शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर ते वाढवण्यासाठी डाळिंब हा एक चांगला पर्याय आहे. डाळिंबामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमीन असतं त्यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल वाढते.

बीट

बीट हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमीन A आणि व्हिटॅमीन C याशिवाय फॉलिक ऍसिड,फायबर, मॅगनीज, पोटॅशियम देखील मोठ्या प्रमाणात असतं.

टोमॅटो

टोमॅटो खाण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होऊ शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ई, थियामिन, निआचिन, व्हिटॅमीन बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर यासारखे पोषक घटक असतात.

खजूर

शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाला असेल तर, खजूर खायला सुरुवात करा. खजुरामध्ये कॉपर, मॅग्नेशिअम, मॅगनीज, व्हिटॅमीन B6 पॅन्टोथेनिक ऍसिड आणि रिबोफ्लॅविन सारखे पोषक घटक असतात.

You might also like
Leave a comment