उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी ट्राय करा उपाय

ऊन वाढत आहे. अशा परिस्थितीत चेहऱ्याला तजेल आणि टवटवीत करण्यासाठी खालील काही गोष्टी तुम्हाला मदत करतील….

फेस मिस्ट

सध्या बाजारपेठेत विविध फेस मिस्ट आढळतात. किंवा आपण हे घरी देखील बनवू शकता. काही गुलाबाच्या पाकळ्या आणि 1 लीटर पाणी असले कि झाले. सकाळी एका भांड्यात पाणी उकळवून त्या मध्ये गुलाबाच्या पाकळ्या घालून रात्रभर ठेवा.

नंतर सकाळी हे पाणी एखाद्या स्प्रे च्या बाटलीत गाळून भरून घ्या. फेस मिस्ट तयार आहे. घराच्या बाहेर असाल तेव्हा आपल्या जवळ फेस मिस्ट बाळगा. प्रत्येक 1-2 तासानंतर चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहील.

कुलिंग फेस पॅक

यासाठी गरज आहे टोमॅटो आणि मधाची. टोमॅटो वाटून त्यामध्ये मध मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या. जर आपला चेहरा तेलकट आहे आणि उष्णतेमुळे तेल निघत आहे तर या पॅक मध्ये थोडंसं हरभराडाळीचे पीठ मिसळा. हे चेहऱ्यावरील जास्तीचे तेल काढून टाकते.

आईस क्यूब

हे चेहऱ्यावर लावल्याने आराम मिळतो चेहरा थंड करण्यासाठी कोरफड जेलच्या रसाला आईस ट्रे मध्ये जमविण्यासाठी ठेवा. हे त्वचेला थंड करण्यासह फायदा देईल.

You might also like
Leave a comment