दिवाळी फराळ करताय? मग ‘हे’ टाळाच!
दिवाळी फराळाचं सर्वांना भलतंच आकर्षक असतं. मात्र फराळ करताना आपल्याकडून आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या काही चूका होतात. या टाळण्यासाठी खालील गोष्टी करा…
- चकल्या किंवा इतर पदार्थ तळल्यानंतर वर्तमानपत्राचा वापर करू नका. कारण वर्तमानपत्राच्या शाईमध्ये घातक घटक असतात. ते शोषल्यास आणि शरीरात गेल्यास त्रासदायक ठरू शकते. वर्तमानपत्राऐवजी टिश्यू पेपरचा वापर करू शकता.
- चिवड्यामध्ये खूप तेल, खोबरं, शेंगदाणे टाळा. त्यांच्याऐवजी भाजलेल्या सुकामेव्याचा वापर करा.
- शंकरपाळी करताना साखरेऐवजी गूळाचा वापर करा. यामुळे चवही सुधारायला मदत होईल.
- करंज्याची पारी बनवताना मैद्याचा वापर करण्याऐवजी मल्टी ग्रेन पीठाचा वापर करा. बेसनाचा त्रास होत असेल तर रवा आणि सुकामेव्याचा वापर करा.
- चकली, शेव तळल्याने त्यामध्ये खूप तेल शोषले जाते. त्याऐवजी बेक्ड शेव आणि बेक्ड चकलीचा पर्याय निवडा.
- फराळ बनवताना एकाच दिवशी सारे पदार्थ बनवण्याची घाई करू नका. सतत तळण्याचे पदार्थ किंवा तेलासमोर बसल्यास त्रास होऊ शकतो.