म्हणून साजरी करतात भाऊबीज
दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. हा सण आज सर्वत्र साजरा होतोय. पण, ही भाऊबीज आहे तरी काय ? महाराष्ट्रातच नव्हे तर, उत्तर भारतातही हा सण साजरा केला जातो. म्हणूनच आपण याविषयी माहिती जाणून घेऊयात.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि त्यानंतर बहिण भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात `ओवाळणी` देऊन बहिणीचा सत्कार करतो.
काय आहे भाऊबीज मागची आख्यायिका ?
- कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते.
- द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा ‘बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो’, अशी यामागची भावना आहे.
- आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी, याकरिता हा भाऊबीजेच्या सण आहे. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिन आहे.
अशी साजरी करा भाऊबीज :
- भावाला पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे.
- पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी.
- पाटासमोर दीप तेवता असावा.
- बहिणीने भावाला टिळा लावून ओवाळावे.
- त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावर धागा बांधावा.
- त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा.
- भावाने बहिणीचा आशीर्वाद घेऊन तिला भेटवस्तू द्यावी.